मुंब्रा येथील कौसा भागात किरकोळ वादातून दोन गटामध्ये वाद झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुण एमआयएम पक्षाच्या कार्यालयात शिरल्याने हल्लेखोरही या कार्यालयात शिरले. त्यामुळे पक्ष कार्यालयातील साहित्याचेही काहीप्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यामागे कोणताही राजकीय वाद नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात मुलांचे पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने एका महिलेला बेदम मारहाण

मुंब्रा येथील बाँबे काॅलनी परिसरात राहणारा बिलाल काझी हा गुरुवारी रात्री दुचाकीने त्याच्या मित्रासोबत परिसरातून जात होता. याच भागातील अकबर शेख हा देखील त्याच्या कारने परिसरातून जात होता. त्याचवेळी त्यांच्या वाहनामध्ये किरकोळ अपघात झाला. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान, बिलाल हा एमआयएम पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभा असताना अकबरने त्याच्या काही साथिदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. अकबरचे साथिदार आले असता, बिलाल हा एमआयएम पक्षाच्या कार्यालयात शिरला. त्यामुळे हल्लेखोरांनी पक्षाच्या कार्यालयात शिरून बिलालला मारहाण करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यामुळे पक्ष कार्यालयातील साहित्याचीही नासधूस झाली.

हेही वाचा >>> डोंबिवली : बालिकेच्या मदतीने भिक्षा मागून गुजराण करणाऱ्या आजी-आजोबांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिलालच्या मित्रांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचेही साथिदार घटनास्थळी आले. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याची माहिती मुंब्रा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटामधील तरुण यात जखमी झाले आहेत. या गुन्ह्यात कोणीही तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांनी स्वत: फिर्याद दिली असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे कोणताही राजकीय वाद नसल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.