कल्याण – कल्याण पश्चिमेतील बारावे येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील कचराभूमीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. कडक उन, जोरदार वारे यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. आधारवाडी, बारावे येथील कचराभूमीला आग लागण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही पाच ते सहावी घटना आहे.

मार्च सुरू झाला की कडक उन्हामुळे कचरा तप्त होतो. विविध प्रकारच्या कचऱ्याच्या मिश्रणातून मिथेन वायू तयार होऊन अनेक वेळा आग लागते. काही वेळा कचऱ्याच्या ढिगांमधील विविध प्रकारचे धातू मिळविण्यासाठी काही कचरावेचक, भंगार विक्रेते कचराभूमीला आग लावतात. कचराभूमीवर कचरा जळून खाक झाला की त्यामधील धातूचे घटक वेचून काढतात.

हेही वाचा – ठाण्यातील महिला मारहाण वादात भाजपची उडी; पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या 

हेही वाचा – अंबरनाथचा कचरा बदलापूरला नकोच ! अंबरनाथच्या कचऱ्यावर सर्वपक्षीय एकवटले, प्रकल्पाला विरोध नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन महिन्यांच्या काळात आधारवाडी, बारावे येथील कचराभूमीला पाच ते सहा वेळा आगी लागल्या आहेत. आगीनंतर धूर शहराच्या मध्यवर्ती भागात पसरतो. कचराभूमी परिसरातील रहिवाशांना याचा विशेष त्रास होतो. बहुतांशी आगी संध्याकाळी, रात्री लागल्या आहेत. बारावे येथील कचराभूमीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी कचराभूमीवर येऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.