ठाणे: घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला. सुदैवाने मोटारीच्या मागील भागावर हा भाग पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. ठाण्याहून घोडबंदच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात शुक्रवारी सकाळी येथील क्रेनचा भाग अचानक कोसळला.
दरम्यान, या मार्गिकेवरून जाणाऱ्या मोटारीवर हा भाग कोसळला. त्यामुळे या मोटारीचे नुकसान झाले. या मोटारीत कुटुंब प्रवास करत होते.
मोटारीच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे वाहतुक पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीही मेट्रोच्या कामा दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.