A severe fire broke out at a house in Bhopar village near Dombivli | Loksatta

डोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले

जखमींना डोबिंवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले
डोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग

डोंबिवली जवळील २७ गावामधील भोपर गावात शनिवारी पहाटे प्रसाद पाटील यांच्या घराला आग लागली. गाव गाढ झोपेत असताना ही घटना घडली. पाटील कुटुंबियांना घरात खूप धूर झाला असल्याचे दिसले. त्यांनी उठून पाहिले तर घराला चारही बाजूने आग लागली आहे. तात्काळ त्यांनी आपल्या पत्नी मुलींसह घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.

हेही वाचा- मध्य रेल्वेचा खोळंबा ; ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

आगीमध्ये प्रसाद पाटील यांची पत्नी प्रीती, त्यांच्या दोन मुली समीरा आणि समीक्षा गंभीर भाजल्या आहेत. त्यांना तात्काळ गावकऱ्यांनी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे. प्रसाद पाटील हेही गंभीररित्या होरपळले आहेत. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना देण्यात आली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- डोंबिवलीजवळील २७ गावांना ९० दशलक्ष पाणी पुरवठा ; मंत्री उदय सामंत यांचे आदेश

जवानांनी एक तासाच्या प्रयत्नात आग विझवली. पहाटेची वेळ आणि हवा नसल्याने आग विझविण्यात अडथळे आले नाही आणि आग पसरली नाही, अशी माहिती अग्निशमन जवानांनी दिली. आग कशामुळे लागली, विद्युत प्रवाहात अडथळा येऊन आग लागली की कोणी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पाणी टंचाई, केबल चालकाची आत्महत्या, रस्ता अडवून कमानीची उभारणी करणे अशा काही कारणांनी भोपर गाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”

संबंधित बातम्या

कसारा-इगतपूरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली ; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ठाणे: अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; महाविकास आघाडीला धक्का
ठाणे: कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक
डोंबिवलीत डॉक्टरची वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण
डोंबिवली; नैराश्यातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्यांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
FIFA WC 2022: मोठा अपसेट! पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा पराभव करत मोरोक्कोने गाठली पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…