लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पश्चिमेतील कॅनरा बँकेच्या शाखेतून बँक व्यवहार पूर्ण करुन बाहेर पडत असताना एका भुरट्या चोराने ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यावर जोराची थाप मारुन गळ्यातील सोन्याचे ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. बुधवारी दुपारी ही घटना घडली.

पार्वती हेगडे (७८) या डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील एव्हरेस्ट सोसायटी भागात राहतात. बुधवारी दुपारी त्या कॅनरा बँकेच्या डोंबिवली पश्चिम शाखेत बँक व्यवहार करण्यासाठी गेल्या होत्या. काम उरकून त्या बँकेतून बाहेर पडल्या. जीन्या उतरत असताना त्यांनी एका बाजुच्या संरक्षित कठ्ड्याला हात पकडला होता.

हेही वाचा… मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील केंद्रात पाली भाषेचे वर्ग

उतरत असताना पाठीमागून आलेल्या एका भुरट्या चोराने पार्वती हेगडे यांच्या गळ्यावर जोराची थाप मारली. पाठीवर काही पडले असे वळून त्यांनी मागे वळून पाहिले तर, त्यांना एक इसम त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळत असल्याचे दिसले. पार्वती यांनी चोर म्हणून ओरडा केला. पण तोपर्यंत चोर पळून गेला होता.

हेही वाचा… बदलापूर: बारवी धरणात एकाच दिवसात १० टक्क्यांची भर, ३२ दशलक्ष घन मिटर पाणी वाढले,बारवी धरण ५६ टक्क्यांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेत पण चोरांचा वावर सुरू असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. पार्वती यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बँक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.