येथील कोलबाड भागातील एका सार्वजनिक गणेशोत्वाच्या मंडपात शुक्रवारी सायंकाळी आरती सुरू असताना एक झाड मंडपावर पडले. त्यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. तसेच दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. कोलबाड येथील जाग माता मंदीर आहे. या मंदिराजवळच कोलबाड मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्वास साजरा करण्यात येतो. या गणपतीच्या मंडपात शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता आरती सुरू होती.

हेही वाचा : महामार्गावर वाहने लुटणाऱ्या ११ जणांच्या आंतराज्य टोळीला भिवंडी पोलिसांकडून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी सुरू झालेल्या मुसळधार पावसादरम्यान एक झाड मंडपावर पडले. या घटनेत राजश्री वालावलकर ( ५५ ) यांचा मृत्यू झाला आहे. प्रतिक वालावलकर (३०), सुहासिनी कोलुंगडे (५६),कीविन्सी परेरा ( ४०), आणि दत्ता जावळे (५०) हे चौघे जखमी झाले आहेत. तर दोन दुचाकींचे आणि गणपती मंडपाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली.