कल्याण – येथील पश्चिम रेल्वे स्थानका जवळील सुधांशु चेंबरमधील तृप्ती लाॅजमध्ये शनिवारी रात्री एका महिलेचा तिच्या प्रियकराने रात्रीच्या वेळेत खून करून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपीला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने उस्मानाबाद येथून सोमवारी अटक केली.

हेही वाचा >>> ज्येष्ठ नागरिकाला पत्नीने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने जाळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयत ज्योती तोरडमल ही आपली पत्नी होती. मागील काही महिन्यांपासून आपण वेगळे राहत होते, अशी माहिती आरोपी भूपेंद्र गिरी याने पोलिसांना दिली आहे. ज्योतीला मारण्याचे नक्की कारण काय आरोपीने सांगितले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. तपासातून ही माहिती पुढे येईल. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, असे साळवी यांनी सांगितले. आरोपी गिरी शनिवारी ज्योतीला घेऊन तृप्ती लाॅजमध्ये आला. तेथे त्याने कट करून पत्नीची हत्या केली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान आरोपी आपण बाजारातून काही सामान घेऊन येतो असे लाॅज व्यवस्थापकाला सांगून बाहेर पडला. त्यानंतर तो परत आला नाही. सकाळी लाॅजचे कामगार गिरी राहत असलेला दरवाजा ठोठावू लागले. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी ज्योतीचा खून केला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.