आर.डी नावाचा दलाल कोण ?

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका धक्काबुक्की प्रकरणाचा पुढील तपास करण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कसे गुंतविता येईल, या दिशेने तपास करीत आहेत. न्यायालयामध्ये जितेंद्र आव्हाड मारत होते असे सांगण्यासाठी काही आरोपींना ५ खोके ऑफर करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. या आरोपांमध्ये दलालाचे नाव आर.डी असा उल्लेखही त्यांनी केला असून हा आर.डी कोण अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “शिंदे आणि फडणवीस सरकार राज्याला भिकारी करणार”, नाना पटोलेंची टीका; म्हणाले, “आगामी निवडणुका…”

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका धक्काबुक्की प्रकरणात जितेंद्र आव्हाड स्वत: आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कलम ३२४ अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास करा असे आदेश दिले आहेत. परंतु, पोलीस पुढील तपास न करता जितेंद्र आव्हाडांना कसे गुंतवता येईल यासाठी मागचाच तपास पुन्हा करीत आहेत, असा आरोप परांजपे यांनी केला आहे. आतातर मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.

हेही वाचा >>> दिव्यात भाजप आणि शिंदेगटात धूसफूस ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या रमाकांत मढवी यांच्यावर थेट आरोप

काही आरोपींना ५ खोके ऑफर करण्यात आले आहेत की, तुम्ही न्यायालयामध्ये जितेंद्र आव्हाड हे मारत होते असे सांगा. त्यांना एक जुना व्हिडीओ दाखवला जातो आणि त्या व्हिडीओमध्ये पोलीसच दाखवतात की, ‘हा बघा जितेंद्र आव्हाड’ आणि सांगतात ‘हा आहे ना’ मग तुम्ही लिहून द्या की, जितेंद्र आव्हाड होते. वास्तविक त्या व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाही. दलालाचे नाव आर.डी असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस देखिल या प्रकरणातील आरोपींना खोटं-नाटं सांगत आहेत. तुम्हांला १५ वर्षे शिक्षा होईल, जन्मठेप लागेल.  तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा. पोलीसांना या गुन्ह्यात इतका इंटरेस्ट का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा तर फक्त कलम ३२४ चा आहे. कारण, सिव्हील हॉस्पिटलने दिलेले सर्टिफिकेट हे सिम्पली इंज्युरीचे आहे. असे असतानाही यात कोणाला इंटरेस्ट आहे आणि आम्हांला हे का कराव लागतयं ? याची माहिती नकळत पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडातून निघाली, असे सांगत यामध्ये इंटरेस्ट कोणाला आहे आणि कोणाचा दबाव आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused offered five crore to say jitendra awhad had beaten says ncp thane city chief anand paranjape zws
First published on: 10-04-2023 at 19:20 IST