ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; आहेर याचे स्थावर मालमत्ता विभागात परतीचे दरवाजे बंद

महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभाग कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार काढून त्याजागी किशोर कदम यांची पालिका प्रशासनाने नियुक्ती केली आहे.

new officers Real Estate Department thane mnc
ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; आहेर याचे स्थावर मालमत्ता विभागात परतीचे दरवाजे बंद

ठाणे : राज्य गुन्हे ‌अन्वेषण विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभाग कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार काढून त्याजागी किशोर कदम यांची पालिका प्रशासनाने नियुक्ती केली आहे. तसेच उपकार्यालयीन अधीक्षक पदी अजिनाथ आव्हाड याची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत आहेर याचे स्थावर मालमत्ता विभागात परतीचे दरवाजे बंद झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी एका गुंडामार्फत कुटुंबियांना संपविण्याची सुपारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यासंबंधीची एक ध्वनिफीत प्रसारित करत त्यातील संभाषण आहेर यांचेच असल्याचा दावा केला होता. विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा त्यांनी उपस्थित करत याप्रकरणी आहेर यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर आहेर यांची राज्य गुन्हे ‌अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू झाली आहे. याशिवाय, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी ठाणे पोलिसांनी आहेर यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच आहेर यांच्या पालिकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे विलास पोतनीस, अनिल परब आणि सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती. त्यावर महेश आहेर यांचे अधिकार काढून त्यांची चौकशी करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर आहेर यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली असली तरी त्यांचा अतिक्रमण विभागाचा सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार मात्र कायम ठेवण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती. दरम्यान, आहेर यांच्या जागी किशोर कदम व उपकार्यालय अधीक्षक पदी अजिनाथ आव्हाड याची नेमणूक ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

हेही वाचा – कल्याणमध्ये तंत्रज्ञानाला कोंडून ठेवणाऱ्या डाॅक्टर विरुद्ध गुन्हा

गेले काही महिने आम्ही महेश आहेर याच्यावर पुराव्यानिशी आरोप करित असतानाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत होता. परंतु आम्हीही सातत्याने या विषयाचा पाठपुराव्या केल्यामुळेच महापालिका प्रशासनाला वरिल निर्णय घ्यायला भाग पडले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, आहेर यांचे स्थावर मालमत्ता विभागात परतीचे दरवाजे बंद झाले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 16:54 IST
Next Story
कल्याणमध्ये तंत्रज्ञाला कोंडून ठेवणाऱ्या डाॅक्टर विरुद्ध गुन्हा
Exit mobile version