उल्लाहसनगरमधील कंपनीत एका कामगाराला अपघात झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या पोलीस निरिक्षकाला लाललूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धनंजय पंढरीनाथ गणगे असे या पोलीस निरिक्षकाचे नाव असून उल्लासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. धनंजय यांना लाचलूचपत विभाने अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांकडूनच मागितले जाते लाच

उल्हासनगरच्या पोलीस परिमंडळ चारच्या क्षेत्रातील पोलिसांची लाचखोरी आणि उदासिनतेची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात समोर आली आहेत. मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी, अटक न करण्यासाठी तसेच दुन्हा दाखल न करण्यासोबतच भंगार व्यावसायिकांकडून प्रतिमाह हफ्ते घेणाऱ्या पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या काही वर्षात आपल्या जाळ्यात पकडले आहे. मात्र, त्यानंतरही पोलीस विभागातील कर्मचारी बिनदिक्कतपणे लाच घेत असल्याचे समोर आले आहे.

२० हजार रुपयांच्या लाचेची मागणी

एका महिला तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीत एका कामगाराला अपघात झाला होता. याप्रकरणी कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नसल्याची बाब पुढे करून कंपनीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस निरिक्षक धनंजय गणगे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती धनंजय गणगे यांनी २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीची दखल घेत दोन पंच साक्षीदार आणि कायदेशीर बाबींची पुर्तता करून यासाठी सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार सहायक पोलीस निरिक्षक धनंजय गणगे यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आले होते. परिमंडळ चारमध्ये पोलिसांकडून लाचखोरीचे प्रकार अजूनही सुरू असल्याचेच दिसून आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.