डोंबिवली- कल्याण लोकलमध्ये विसरलेली एका नोकरदार महिलेची पिशवी रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे रविवारी परत मिळाली. या पिशवीत लॅपटाॅप, विदेशी चलन असे एकूण तीन लाख २९ हजाराचा ऐवज होता. कल्याणमधील योगीधाम भागातील नोकरदार महिलेची ही पिशवी होती.कल्याण पश्चिमेतील योगीधाम भागात राहत असलेली पुर्णिमा मेनोन ही महिला मुंबईत नोकरी करते. त्यासाठी ती लोकलने प्रवास करते. शनिवारी सायंकाळी ही महिला मुंबईतून कल्याण लोकलने कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९ वाजता आली. पूर्णिमा या घाई गडबडीत उतरून घरी गेल्या. त्यानंतर त्यांना आपली कार्यालयात नेलेली पिशवी लोकलमध्ये विसरल्याची बाब लक्षात आली. त्यांनी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील नियंत्रण कक्षाला संपर्क केला. घडला प्रकार सांगितला. नियंत्रण कक्षातून ही माहिती कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षा बळाला देण्यात आली. 

तोपर्यंत मोटरमनने कल्याण रेल्वे स्थानकातून लोकल ठाकुर्ली यार्डमध्ये नेली होती. ठाकुर्ली यार्डातील रेल्वे सुरक्षा बळाचे जवान जल सिंह यांना कल्याण रेल्वे स्थानकातून यार्डात आलेल्या कल्याण लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात एका महिला प्रवाशाची कार्यालयीन पिशवी विसरल्याची माहिती देण्यात आली. सिंह यांनी त्या डब्यात जाऊन पिशवी ताब्यात घेऊन डोंबिवली रेल्वे सुरक्षा बळाच्या ताब्यात दिली. बँगेची तपासणी करण्यात आली. त्यात एक लॅपटाॅप, १०० अमेरिकन डाॅलरच्या ३० नोट असे एकूण तीन लाख २९ हजार रुपयांचे सामान पिशवीत आढळून आले. रविवारी साहाय्यक उपनिरीक्षक राज कुमार यांच्या उपस्थित पुर्णिमा यांची कार्यालयीन पिशवी त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप