ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून वीर सावरकर यांच्या नावाने राज्याचे राजकारण तापत असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने फलकबाजी सुरू केली आहे. या फलकावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारत असल्याचे चित्र असून उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळत ‘मर्द’, ‘मर्द’ म्हणाणाऱ्यांनी मर्दासारखं वागावं, सोडून द्यावी लाचारी आणि आच्यासारखं जगावं म्हणत त्यांच्यावर टिका केली आहे. तसेच सावरकरांचा अपमान बाळासाहेबांनी हाणले जोडे असेही यामध्ये लिहीले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, नागरिकांनी पायी चालत ठाणे रेल्वेस्थानक गाठले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्व द्रुतगती महामार्ग येथील पाचपाखाडीजवळ हे फलक उभारण्यात आले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डावीकडे छायाचित्र असून उजवीकडे मोठ्या आकारात सावरकर यांचे छायाचित्र आहे. तर या दोन्ही छायाचित्रांच्या मधोमध दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आहे. २००४ मध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले होते. ते क्षणचित्र या छायाचित्रात असून बाळासाहेब हे अय्यर यांच्या गालावर जोडे मारत असल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने हा फलक उभारला आहे. या फलकावर उद्धव ठाकरे यांचे नामोल्लेख टाळत ‘सावरकरांचा अपमान, बाळासाहेबांनी हाणले जोडे, ‘काहींनी’ केला निषेध आणि नेमहमीचे शब्द बुडबुडे. ‘मर्द’, ‘मर्द’ म्हणाणाऱ्यांनी मर्दासारखं वागावं, सोडून द्यावी लाचारी आणि आच्यासारखं जगावं. असेही म्हटले आहे. हे फलक सध्या ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.