Navratri Celebration, Garba2025 / ठाणे : शारदीय नवरात्रौत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी देवीचे आगमन झाले आहे. शारदीय नवरात्रौत्सव हा सगळ्यांचा आनंदाच क्षण असतो. विशेष करुन महिलांचा नऊ दिवस नऊ वेगवेगळे रंगाच्या किंवा ड्रेस परिधान करण्यास त्यांना विशेष आवडते. तर, आणखी एक या उत्सवाचे वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे गरबा – दांडिया.
मुंबई, ठाणे तसेच उपनगरीय शहरांमध्ये गरबा-दांडिया मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. यात, तरुण मंडळी उत्साहाने सहभागी होत असतात. आजपासून सर्वत्र गरबा-दांडियाची धूम सुरु होईल. गरबा -दांडियासाठी काही ठिकाणे ही लोकप्रिय आहेत की, त्याठिकाणी जाण्यास तरुण वर्ग प्राधान्य देतात.
ठाण्यातील देखील अशीच काही गरबा – दांडियाची ठिकाणे लोकप्रिय आहेत. रंगीबेरंगी लाईट्स, आकर्षक डेकोरेशन आणि जोशपूर्ण संगीतासह येथे खेळला जाणारा गरबा-दांडिया तरुणाईला भुरळ घालतो. तर. ठाण्यातील या ५ प्रसिद्ध स्थळांवर प्रवेशशुल्कासह मिळणार खास नवरात्रीचा आनंद…
१) संकल्प प्रतिष्ठान, रघुनाथ नगर
ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरात संकल्प प्रतिष्ठानचा म्हणजेच शिवसेना (शिंदेगट) नेते रविंद्र फाटक यांच्या गरब्याचे तरुणांना विशेष आकर्षण आहे. या गरब्याला ‘संकल्प दांडिया उत्सव’ असे म्हटले जाते. या गरब्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून या गरब्याला कलाकार उपस्थिती लावतात. शिस्तबद्ध पद्धतीने याठिकाणी गरबा खेळला जातो. मुले मुली वेगवेगळ्या पारंपारिक पोशाखात गरब्यात सहभागी होत असतात.
२) शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, शिवाईनगर
ठाण्यातील शिवाईनगर भागात शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळामार्फत गरब्याचे आयोजन केले जाते. या परिसरातील नागरिकांसाठी एक या गरब्याचे विशेष आकर्षण आहे. याठिकाणी गोलाकार आकारात अतिशय पारंपारिक पद्धतीने गरबा खेळला जातो. प्रत्येक दिवसाची एक संकल्पान ठरवली जाते, त्यानुसार याठिकाणी गरबा पार पडतो.
३) बोरिवडे मैदान, घोडबंदर रोड
घोडबंदर रोड येथील बोरिवड मैदानात यंदा प्रथमच प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग ग्रुप यांच्यातर्फे जीएम नवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गरबा प्रिन्स दिव्य कुमार यांच्या गाण्यांनी गरब्याची पर्वणी घोडबंदर वासियांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे यंदा या गरब्याचे देखील विशेष आकर्षण असणार आहे.
४) रासरंग, रेमंड ग्राऊंड
ठाण्यातील रेमंड ग्राऊंडवर होणारा रासरंग (RaasRang) गरबा हा नवरात्रीतील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा दांडिया-गरबा महोत्सव पार पडणार असून दररोज संध्याकाळी ७ वाजता उत्सवाची सुरुवात होईल. रंगीबेरंगी डेकोरेशन, लाईव्ह म्युझिक, जोशपूर्ण डीजे आणि आकर्षक परफॉर्मन्स यामुळे रासरंग हा ठाणेकरांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
पारंपरिक पोशाखात सजलेले सहभागी नृत्याच्या तालावर थिरकताना एक वेगळेच उत्साहवर्धक वातावरण निर्माण करतात. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि तरुणाईसाठी हा कार्यक्रम नवरात्रीच्या आठवणींना अविस्मरणीय करणारा ठरतो. या गरब्यासाठी ठराविक असे शुल्क आकारले जातात.
५) नाटिक नगदा दांडिया नाईट, अनंत बॅंक्वेट मानपाडा
मानपाडा येथील अनंत बॅंक्वेट मध्ये नाटिक नगदा दांडिया नाईट (DandiyaNights) हा खास नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात आयोजित करण्यात आला आहे. दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नाटिक नगदा आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने ठाणेकरांना गरबा-दांडियाच्या रंगात रंगवणार आहेत.
कार्यक्रमासाठी सिंगल एंट्रीपासून ग्रुप पॅकेजपर्यंत विविध प्रकारची तिकीटे उपलब्ध असून ४९९ पासून सुरू होतात. आकर्षक डेकोरेशन, उत्साही संगीत आणि पारिवारिक वातावरणामुळे हा दांडिया नाईट तरुणाई तसेच कुटुंबीयांसाठी विशेष ठरणार आहे.