डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील सुभाष छेद रस्ता भागातील एका रस्त्याच्या मध्यभागातील कूप (चेंबर) तुटले आहे. तुटलेल्या भागात अपघात टाळण्यासाठी रहिवाशांनी वाहन चालक, पादचाऱ्यांना इशारा देण्यासाठी अवजड वस्तू आणून ठेवल्या आहेत.मागील काही दिवसांपासून हे कूप (चेंबर) तुटले आहे. पालिकेकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. पण कोणीही पालिका अधिकारी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नाहीत, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. गणेशनगर कडून येणारी वाहने सुभाष रस्ता छेद मार्गाने उमेशनगर, ह प्रभाग कार्यालयाकडे जातात. या मधल्या वर्दळीच्या रस्त्यात हे कूप तुटले आहे.

रात्रीच्या वेळेत हे तुटलेले कूप दिसले नाहीतर दुचाकी स्वार या कुपात पडण्याची शक्यता आहे. मोटारीचे चाक या कुपात अडकण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली. या भागातून वाहन जाऊ नये म्हणून एका बाजुचा रस्ता बांबू आडवा टाकून बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजुला रस्त्यात मोठा खड्डा आहे. त्यामुळे वाहन चालक, पादचाऱ्यांना या रस्त्यामधून जाताना कसरत करावी लागते. मुसळधार पाऊस सुरू असला की या रस्त्यावरुन प्रवास करणे मुश्किलीचे होते.

हेही वाचा >>>Video : “देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ, त्यांच्या श्रमातून…”, देवेंद्र फडणवीस यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक माजी नगरसेवक, त्यांचे कार्यकर्तेही या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. काही अपघात घडला तरच पालिका हे तुटलेले कूप दुरुस्त करणार का, असे प्रश्न रहिवाशांकडून केले जात आहेत.