ठाणे: आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करणाऱ्यांना शुभेच्छा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray thane news amy 95 | Loksatta

ठाणे: आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करणाऱ्यांना शुभेच्छा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील चार-पाच नव्हे तर ५० आमदार आणि १३ खासदार एखाद्या पक्षाला आणि नेत्याला सोडून जातात.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

राज्यातील चार-पाच नव्हे तर ५० आमदार आणि १३ खासदार एखाद्या पक्षाला आणि नेत्याला सोडून जातात. इतकेच नाहीतर राज्यासह इतर राज्यातील पदाधिकारीही आणि स्वतःचे नातेवाईकही सोडून जातात. याचा अर्थ त्या नेत्याने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करायला हवे. परंतु, असे करण्याऐवजी आरोप करीत असतील तर त्यांना शुभेच्छा देतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. मी आरोपाला कामाने उत्तर देतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>ठाणे: कोपरी पूल उद्घाटनासाठी कोपरी पूलाच्या मार्गिका पुन्हा बंद ?

मी टीकेला उत्तर देणे टाळतो. त्यांनी दोन आरोप केले तर चार कामे करून त्याने उत्तर देतो. आरोप -प्रत्यारोपामध्ये नागरिकांना रस नसतो. त्यांच्यासाठी काय करतो, यात त्यांना रस असतो. त्यामुळे आमचे सरकार जनतेच्या हिताची कामे करीत आहे, असेही ते म्हणाले. गेली अडीच वर्षे राज्यात नकारात्मक वातावरण होते. या काळात विकास कामे थांबविण्यात आली होती. पण, आता आमचे सरकार आल्यानंतर आता काम प्रगतीवर असून त्याचबरोबर अनेक नवे प्रकल्प सुरु झाले नव्याने आले आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या आमच्या सरकारला लोक मतदान करतील की काम थांबविणाऱ्याला मतदान करतील हे लोक ठरवतील. त्यासाठी जनता सुज्ञ आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली १०० धावपटुंची यशस्वी दौड

राज्यातील महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळेल असे सांगितले जात असले तरी देशातील मूठभर लोकांमधून हा सर्व्हे करण्यात आला आहे. केंद्रात एनडीएचे सरकार येईल, असे सर्व्हेत म्हटले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये काही वेगळे चित्र नाही. आमच्या पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश, हा एक नमुना होता. येणाऱ्या काळात महपालिका आणि बाकीच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष आघाडीवर राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा >>>कल्याण: तडीपारीचा सोक्षमोक्ष लावण्याचे कल्याणच्या बंड्या साळवी यांचे पोलिसांना आवाहन

देशातल्या मुलांनी परीक्षाचे टेन्शन घेऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मी देखील महापालिका शाळामध्ये शिकलो याचा मला अभिमान असून ज्या शाळेत शिकलो, तिथे कार्यक्रमासाठी आलो आहे. या शाळेत आधी चाळ होती, आता इमारत झाली आहे. आगळी वेगळी आठवण आहे. शिक्षक हे मोठे असतात, ते ज्ञानदानच काम करत असतात, असेही ते म्हणाले आता कोणाची आघाडी होईल आणि कोणाची तुटेल हे सांगा येणार नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:44 IST
Next Story
“दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून तिथे तुमची..”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!