कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक नागरिक आपल्या भागातील नागरी समस्या व इतर प्रकरणांच्या तक्रारी पालिकेकडे करतात. या अर्जांवर अधिकाऱ्यांकडून एकमेकाकडे बोट दाखवून टोलवाटोलवी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी एका आदेशाने दिला.

हेही वाचा >>> समृध्दी महामार्गात जमिनीचे तुकडे झाल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर मधील शेतकरी अडचणीत

पालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवा विषयक कामे घेऊन कर्मचारी विविध अर्ज, तक्रारी प्रभाग कार्यालय, नागरी सुवधा केंद्रात देत असतात. त्यांच्या अर्जावर विहित वेळेत निर्णय घेतला जात नाही. यामुळे प्रशासकीय दिरंगाई समोर येऊन नागरिक व कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागते. पालिका प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता यावी म्हणून आपण आपल्या अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण केले आहे. असे असताना प्रभाग स्तरावरील नागरी समस्यांचे प्रश्न वरिष्ठ स्तरावर येत आहेत. नागरिकांचे अर्ज पालिकेत आले की त्या अर्जावर विहित वेळेत निर्णय न घेणे किंवा हे आपले काम नाही म्हणून तो अर्ज प्रलंबित ठेवणे. आपल्या कार्यक्षेत्रातील अर्ज नाही म्हणून अधिकाऱ्यांकडून त्या अर्जावर टोलवाटोलवी केली जाणे हे प्रशासनात अभिप्रेत नाही. शासन निर्णयाचा संदिग्ध अर्थ लावून निर्णय घेणे, एखाद्या अर्ज विषयावर मार्गदर्शन मागविणे हे कालापव्यय करणारे आहे. त्यामुळे असे विषय स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन मार्गी लावावेत, अशा सूचना आयुक्तांनी उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा >>> समृध्दी महामार्गात जमिनीचे तुकडे झाल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर मधील शेतकरी अडचणीत

नागरिकाचा अर्ज, एखादे कर्मचाऱ्याचे प्रकरण समोर आले तर ते विहित वेळेत मार्गस्थ झाले पाहिजे. अनावश्यक त्या प्रकरणाचा, अर्जाचा किस काढून तो अर्ज प्रलंबित ठेऊ नये. असे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहेत. ज्या प्रकरणांचे निराकरण स्थानिक पातळीवर होत नाही. अशी प्रकरणे धोरणात्मक निर्णयासाठी आयुक्त पातळीवर पाठवावीत. यावेळी अपूर्ण, संदिग्ध, मोघम माहितीच्या आधाराची प्रकरणे दाखल करू नये, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुचविले आहे.

हेही वाचा >>> अंबरनाथ : नगरसेवकांच्या अरेरावीमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष ; लेखणी बंद आंदोलन करून व्यक्त केला निषेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या अधिकाऱ्यांकडून नागरिक, कर्मचारी सेवा विषयक प्रश्न मार्गी लावण्यात हयगय, चालढकल केली जात असेल अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डाॅ. दांगडे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.पालिकेच्या कारभारावर गेल्या १५ दिवसांपासून लोकप्रतिनिधींकडून टीका सुरू आहे. यामध्ये प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे. नागरिकांच्या तक्रार अर्जावर प्रभागातील साहाय्यक आयुक्त विहित वेळेत निर्णय घेत नसल्याने ही प्रकरणे नागरिकांकडून पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडली जातात. तेथे निर्णय झाला नाही तर हे प्रकरण आयुक्तांकडे जाते. या वेळकाढू, संथगतीचा कामाचा फटका नागरिक, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणांना बसत आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.