लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: इमारत बांधकामाच्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात चारजणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला करून शनिवारी गंभीर जखमी केले. यापूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेऊन हा प्रकार या टोळक्याने केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अक्षय कवडे (२४, रा. आडिवली-ढोकळी) असे जखमी पर्यवेक्षकाचे नाव आहे. खंजिर उर्फ कुलदीप (रा. दावडी), राकेश हाजरा, मनीष चौहाण, मुकेश हाजरा अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा… ठाण्यातील गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सांगितले, अविनाश झा या मित्रासोबत तक्रारदार कवडे रात्रीच्या वेळेत दुचाकीवरून आडिवली येथील घरी चालला होता. रस्त्यात मित्र माणिक भेटल्याने ते गप्पा मारत उभे होते. तेथे दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी तक्रारदार कवडे याला पाहून आता आम्ही तुला सोडत नाही, असे बोलून सफेद पोतडीमधून आणलेली तलवार बाहेर काढून त्याच्यावर वार केले. भांडण सोडविण्यासाठी अक्षयचा मित्र मध्ये पडला. त्याच्यावरही टोळक्याने वार करून लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.