लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: तांत्रिक बिघाड झालेल्या एका अवजड कंटनेरच्या धडकेत सोमवारी सकाळी कल्याण मधील पत्रीपुलाजवळ दोन रिक्षांचा चुराडा झाला. यामध्ये एका रिक्षेतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. दुसऱ्या रिक्षेत प्रवासी नसल्याने त्या रिक्षेचे नुकसान झाले.

सोमवारी सकाळी एक अवजड कंटेनर लोखंड घेऊन जात होता. अचानक या कंटेनेरचे स्टेअरिंग घट्ट झाले. कंटेनर चालकाला स्टेअरिंगच्या साहाय्याने कंटेनर वळविणे अवघड झाल्याने वाहतूक पोलिसांनी चालकाला कंटेनर रस्त्याच्या एका बाजुला घेण्याची सूचना केली. कंटेनर एका बाजुला घेत असताना अचानक कंटेनरचे स्टेअरिंग घट्ट झाले. चालकाला ते दोन्ही बाजुला वळविणे अवघड झाले. या गडबडीत चालकाला कंटेनवरील ताबा सुटून कंटेनर विरुध्द दिशेकडून येत असलेल्या दोन रिक्षांवर आदळला.

हेही वाचा… डोंबिवलीतील भूमाफियांवर ‘एसआयटी’, ‘ईडी’ची करडी नजर, तपास यंत्रणांकडून भूमाफियांच्या चौकशीला पुन्हा वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका रिक्षेत दोन प्रवासी आणि रिक्षा चालक होता. एक रिक्षा चालक विना प्रवासी रिक्षा घेऊन चालला होता. प्रवासी असलेल्या रिक्षेतील प्रवासी कंटेनरच्या धडकेत जखमी झाले. कंटेनरची धडक एका रिक्षेच्या दर्शनी भागाला जोरदार बसली. त्याचा फटका रिक्षा चालकाला बसला. तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला कल्याण मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे महम्मद खान या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

हा अपघात होताच पाऊण तास पत्रीपूल परिसरात दोन्ही बाजुने वाहन कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी वेगवान हालचाली करुन अपघाती दोन्ही रिक्षा बाजुुला घेतल्या. कंटेनर एका बाजुला घेण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.