पंजाबमधील दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्या संपर्कात असलेले आणि पोलिसांना हव्या असलेल्या याच राज्यातील सोनू खत्री टोळीच्या तीन कुख्यात गुन्हेगारांना सोमवारी सकाळी पंजाबचे गुन्हेगार टोळी विरोधी पथक आणि महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाने कल्याण जवळील आंबिवली भागातील एन. आर. सी. काॅलनीतील यादवनगर भागातून अटक केली.

हेही वाचा- ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायतसमिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

शिव अवतार महातूर (२२, नवा शहर, पेठ महंत, शहीद भगतसिंग नगर, पंजाब, गुरमुख नरेशकुमार सिंग (२३, रा. उधनेवाला, ता. बलाजोर, भगतसिंग नगर, पंजाब, अमनदीपकुमार गुरमिलचंद उर्फ रँचो (२१, रा. खमा चौक, बंगाशहर, भगतसिंग नगर, पंजाब) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोून खत्र टोळीचे पंजाब मधील मोहिली पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले तीन कुख्यात गुन्हेगार महाराष्ट्रातील कल्याण शहरा जवळील आंबिवली भागातील एन. आर. सी. काॅलनी मधील यादवनगर भागात लपून बसले आहेत. अशी गुप्त माहिती पंजाबच्या मोहिली विभागाचे पोलीस अधीक्षक राजन परविंदर यांना मिळाली होती. अधीक्षक परविंदर यांनी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाशी संपर्क करुन या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी साहाय्य करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा- ठाणे : अचानक लागलेल्या आगीत टीएमटी बस जळून खाक

राज्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीगारांकडून गुन्हेगार आंबिवली यादवनगर परिसरात लपले असल्याची खात्री पटल्यावर सोमवारी सकाळी मोहिली पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकांनी एकत्रितपणे यादवनगर भागात छापे टाकले. तिन्ही आरोपींना अटक केली.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यात २५६ आत्महत्या; २० अल्पवयीन मुलांनी संपवले जीवन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद्यांच्या संपर्कातील गुन्हेगार कल्याण जवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपींना आंबिवली भागात कोणी आसरा दिला. ते या भागात कसे आणि कशासाठी आले होते. त्यांना निवासासाठी कोणी जागा दिली असे अनेक प्रश्न उपस्थित करुन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या कारवाईत दहशतवादी विरोधी पथकाचे विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई युनिट, फोर्स वन आणि जलद प्रतिसाद पथक आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले होते. पंजाब मधील राहोन पोलीस ठाण्यात खुनाच्या दाखल गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. पंजाब पोलीस या आरोपींच्या मार्गावर अनेक दिवसांपासून होते. खतरनाक गुन्हेगार कल्याण परिसरात येऊन राहत आहेत याची थोडीही चाहूल स्थानिक गोपनीय पोलिसांना न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.