डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराचा त्याच्या मित्राने पैशांच्या देण्या घेण्यावरुन शनिवारी दुपारी कल्याण येथे खून केला. खून केल्यानंतर मित्रानेच ही माहिती संपर्क करुन पोलिसांना कळविली. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीला आला.
बीपिन दुबे (२९) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो डोंबिवली एमआयडीसीत दशमेश कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होता. तो कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथे आपला भाऊ पवन दुबे याच्या सोबत राहत होता. पोलिसांनी सांगितले, मयत बीपिन दुबे आणि राजेश्वर पांडे हे दोघे अनेक वर्षापासून मित्र होते. राजेश्वरचा मोबाईल विक्री आणि पैसे हस्तांतरण व्यवसाय आहे. दोघेही एकमेकांच्या घरी, दुकानात जात येत होते.

हेही वाचा >>>ठाण्यात व्यावसायिकावर गोळीबार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी सकाळी बीपिन दुबे कामावर जातो म्हणून त्याच्या दुचाकी वरुन निघून गेला. तो कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. दुपारी दोन वाजता पवन दुबे यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून तुमच्या भावाचा राज सोसायटी, तिसगाव नाका येथील एका सदनिकेत खून करण्यात आला आहे. हा खून त्याचा मित्र राजेश्वर याने केला असल्याची माहिती दिली. बीपिनवर बकरा कापण्याच्या धारदार सत्तुर शस्त्राने वार केले होते. त्याच्या सर्वांगावर जखमा होत्या. रक्तस्त्राव झाला होता. पवनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेश्वर पांडे याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.