ठाणे महापालिकेच्या खोदकामामुळे शुक्रवारी कोलशेत भागात आठ तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याचा फटका येथील शेकडो नागरिकांना सहन करावा लागला. सकाळी १० वाजता खंडीत झालेला विद्युत पुर‌वठा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजता सुरळीत केला.

हेही वाचा- कबुतरांना खाद्यपदार्थ टाकल्यास पाचशे रुपये दंड; ठाणे महापालिकेची शहरात फलकबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलशेत येथे एव्हरेस्ट परिसर आहे. या परिसरात महापालिकेकडून खोदकाम सुरू होते. या खोदकामादरम्यान भूमिगत विद्युत वाहिनीला जेसीबीचा धक्का बसला आणि विद्युत वाहिनी तुटल्या. त्यामुळे येथील काही इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या विद्युत तुटलेल्या विद्युत वाहिनी जोडण्यासाठी सुमारे आठ तास लागले. त्याचा फटका येथील नागरिकांना बसला. अनेकांची कार्यालयीन तसेच महत्त्वाची कामे विद्युत पुरवठा बंद असल्याने खोळंबली होते. सायंकाळी ७ वाजता हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली.