ठाणे : महायुतीच्या जागावाटपात धाराशिव मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्तिप्रदर्शन केले. धाराशिवची जागा शिवसेनेचाच मिळावी, असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते.

धाराशिव मतदासंघातून २०१९ ला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते. परंतु शिवसेनेतील बंडानंतर राजकीय समीकरणे बदलली असून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली आहे. त्यामुळे शिंदेच्या सेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली जात होती. तसेच महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह शिंदेच्या सेनेचे मंत्री पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धरला आहे. परंतु महायुतीच्या जागावाटपात धाराशिव मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने ते अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा : ठाणे पोलिसांची ‘ऑलआऊट’ मोहीम, चार तासांत ४१७ गुन्हेगारांची झाडाझडती; मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातूनच धनंजय सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सोमवारी रात्री ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदिप निवासस्थान परिसरात ठाण मांडत शक्तिप्रदर्शन केले. धाराशिवची जागा शिवसेनेचाच मिळावी, असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.