ठाणे : ठाणे शहरातील सर्वाधिक इमारती उभ्या राहणाऱ्या घोडबंदर भागाचा प्रवास जीवघेणा कसा ठरतो आहे, याचे चित्रीकरण नुकतेच समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने तेथून वाहनासकट पळ काढला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारा भाग आहे. नागरिकरण वाढले असले तरी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणी अशा प्रकल्पांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून येथील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत.
ठाणे शहरातील सर्वाधिक वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक इमारती उभ्या राहणारा परिसर घोडबंदर रोड. पण या भागाचा प्रवास आता नागरिकांसाठी एक भयानक अनुभव ठरत आहे. नुकतेच समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओने या धोकादायक वास्तवाचे भीषण चित्र उघड केले आहे. त्या व्हिडीओमध्ये घोडबंदर रस्त्यावरून एक वाहन भरधाव वेगाने धावताना दिसते आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपघात घडताच कारचालकाने वाहन थांबवण्याऐवजी थेट पळ काढला. काही सेकंदांच्या चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी रस्त्यांच्या स्थितीबद्दल, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आणि बेफाम वाहनचालकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घोडबंदर की अपघाताचे केंद्र
ठाण्याच्या नागरीकरणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. प्रचंड प्रमाणात नवनवीन टॉवर्स, मॉल्स, बँका, शाळा आणि आयटी कंपन्या येथे उभ्या राहत आहेत. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी आता नेहमीची बाब झाली आहे. तसेच अवजड वाहनांची वाहतुक यामुळे हा मार्ग अपघाताचे केंद्र बनले आहे.
नेमके व्हिडीओत काय आहे?
या व्हिडीओमध्ये एक भरधाव वाहन जात आहे. पातलीपाडा भागात हे भरधाव वाहन आल्यानंतर त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी काही अंतर पुढे गेली. तर वाहन चालक रस्त्यावर पडला. अपघात केल्यानंतर त्या वाहन चालकाने आणखी वेगाने वाहन चालविले. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित होत आहे. तसेच समाजमाध्यमावरही संताप व्यक्त केला जात आहे.
