कल्याण-डोंबिवली परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत दिवाळी निमित्ताने प्रदूषण वाढवणारे फटाके आणि फटाक्यांची आतषबाजी करण्याऱ्या दीडशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. बुधवारी उशीरापर्यंत हे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे फटाक्यांची आतषबाजी अनेकांना महागात पडल्याचे चित्र दिसत आहे.

आम्ही कालपासून झोन तीनमध्ये कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी १५४ जणांवर कारवाई केली आहे. प्रदूषणाच्या दृष्टीने काळजी करताना दिसत नाही. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं, वृद्ध माणसं, अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास होऊ नये याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी केली पाहिजे. जर नागरिकांनी ऐकलं नाही तर आम्हाला कारवाईचं स्वरुप आणखी कठोर करावं लागेल असं एसीपी सुनील कुराडे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांची रोषणाई केली जाते. अशात फटाक्यांची आतषबाजी करण्याची मर्यादा कोर्टाने घालून दिली आहे. रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके उडवले जावेत असे आदेश देण्यात आले. मात्र या नियमांचं उल्लंघन कऱण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आत्तापर्यंत १५४ जणांवर कारवाई केली गेली आहे.