ठाणे : राज्याचे पर्यटन विभाग, ठाणे महापालिका आणि परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने ठाण्यातील ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी गणेश दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते २ आणि ५ ते ७ सप्टेंबर या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असल्याने यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही गणेशोत्सव काळात विविध देखावे, सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. जेष्ठ नागरिकांनाही शहरातील गणेश मुर्तींचे दर्शन घेता यावे तसेच गणेशोत्सव मंडळांनी तयार केलेले देखावे पाहता यावे यासाठी राज्याचे पर्यटन विभाग. ठाणे महापालिका आणि परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने गणेश दर्शन यात्रा घडविली जाणार आहे.

हेही वाचा : ठाणे : फुलांच्या दरात वाढ ; गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ

परिवहन महामंडळाने वातानुकूलित बसगाड्या, ठाणे महापालिकेने आरोग्यसेवक, तर राज्याच्या पर्यटन विभागाने मार्गदर्शक आणि अल्पोपहार अशा सुविधा देण्याचे ठरविले आहे. तसेच सर्व मंडळात गणेश दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. १,२, ५, ६ आणि ७ सप्टेंबर या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे पर्यटन विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

ऑनलाईन गणेश पूजनाला गणेश भक्तांची सर्वाधिक मागणी ; डोंबिवलीतून बुधवारी सकाळी १०.३० वाजता थेट गणपती पूजन प्रक्षेपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पर्यटनासाठी प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी ७५ रुपयांचा ऑनलाईन भरणा केल्यास सहलीत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी http://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची असून अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालयाचे प्रशांत -९०२९५८१६०१ किंवा कल्याणी – ७०३०७८०८०२ यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पर्यटन संचालनालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे.