घोडबंदर रोड येथील पातलीपाडा भागात हिरानंदानी इस्टेट परिसरात असणाऱ्या सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीच्या मीटर बॉक्सला शनिवारी आग लागली. या आगीमुळे झालेल्या धुरात अडकलेल्या २०० जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. इमारतीच्या आवारात नववर्ष स्वागतयात्रेची तयारी सुरू असताना ही घटना घडली.
इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी विद्युत केबल आल्याने आगीने रौद रूप धारण केले आणि आग सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने इमारतीच्या रहिवाशांमध्ये एकच पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात अडकलेल्या सुमारे २०० रहिवाशांची सुटका केली.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2015 रोजी प्रकाशित
घोडबंदरमध्ये इमारतीच्या मीटर बॉक्सला आग
घोडबंदर रोड येथील पातलीपाडा भागात हिरानंदानी इस्टेट परिसरात असणाऱ्या सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीच्या मीटर बॉक्सला शनिवारी आग लागली. या आगीमुळे झालेल्या धुरात अडकलेल्या २०० जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. इमारतीच्या आवारात नववर्ष स्वागतयात्रेची तयारी सुरू असताना ही घटना घडली. …
First published on: 22-03-2015 at 04:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghodbunder building power miter catches fire