ठाणे – मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव पुलावर कंटेनर बंद पडल्याने वाशिंद ते शहापूर येथील गोठेघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नाशिकहून ठाणे, मुंबईत येणाऱ्या वाहन चालकांचे हाल होत आहेत. या कंटेनरला रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी आणखी २ ते ३ तास लागण्याची शक्यता आहे. नाशिक येथून सिमेंट वाहून नेणारा कंटेनर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भिवंडीच्या दिशेने वाहतूक करत होता. हा कंटेनर आसनगाव पुलाजवळ आला असता तो बंद पडला. त्यामुळे वाशिंद ते गोठेघर पर्यंत दोन्ही दिशेकडे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2023 रोजी प्रकाशित
कंटेनर बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी
कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-10-2023 at 12:11 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy traffic jam on mumbai nashik highway due to container problem