ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात चाळीतील घरांच्या छताला विद्युत तारेचा स्पर्ष होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील चारजण जखमी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही सामावेश आहे.

आलिमुद्दीन सय्यद (३५), सलमा सय्यद (३०), फातिमा सय्यद (४) आणि आलिना सय्यद (५) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृतनगर येथील दादी काॅलनी परिसरात लोकवस्ती आहे. येथील एका घरामध्ये सय्यद कुटुंब भाड्याने वास्तव्य करतात. या घरांवरून टाटा पाॅवरची विद्युत तार गेली आहे. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास या तारेचा स्पर्ष सय्यद आणि त्यांच्या शेजारील घराच्या छताला लागला. त्यामुळे घरातील लाकडी साहित्य, कपड्यांनी अचानक पेट घेतला. या आगीमध्ये आलिमुद्दीन, सलमा, फातिमा आणि आलिना हे चौघेही भाजले गेले.

हेही वाचा… डोंबिवलीतील देवीचापाडा येथील रस्त्याला बाधित बेकायदा इमारत जमीनदोस्त करा,आयुक्तांचे ह प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश

हेही वाचा… गटारांवर झाकणे नुसल्यामुळे दुर्घटना झाली तर कारवाई होणार; ठाणे महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले तसेच चौघांनाही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. चौघांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पथकाने सांगितले.