डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई येथील पेट्रोल पंपाच्या जवळ सोमवारी संध्याकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका मोटार चालकाला (कॅब) तीन महिलांनी बनावट विदेशी चलन देऊन एक लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. राहुल सुरेश मिश्रा असे तक्रारदार चालकाचे नाव आहे. ते टिटवाळा येथे राहतात. प्रवासी वाहतूक करत असताना ते काटई येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. तेथे तीन महिलांनी राहुल यांना पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावून घेतले.

हेही वाचा : माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्याकडे दुबईतील चलनाच्या २०० नोटा आहेत. त्या तुम्ही घ्या. या बदल्यात तुम्ही आम्हाला दीड लाख रूपये द्या, असे बोलून चालकाकडील दीड लाख रूपये घेऊन महिलांनी विदेशी चलनाच्या नोटा असल्याचे भासवून कागदाच्या बंडलची पिशवी दिली. विदेशी चलन मिळाले आहे म्हणून चालकाने ते सुरक्षित ठेवले. घरी गेल्यावर जाऊन त्याने पाहणी केल्यावर आपली फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी राहुल मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.