डोंबिवली : येथील पूर्व भागातील ध. ना. चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेना पक्षातर्फे डोंबिवली रासरंग गरबा कार्यक्रमाचे १४ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नांदिवली रस्त्याने ध. ना चौधरी विद्यालयाकडे येणाऱ्या वाहनांना एकतानगर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

ही वाहने एकतानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उजवीकडे वळण घेऊन संगीतावाडी येथून डोंबिवली रेल्वे स्थानक किंवा इच्छित स्थळी जातील. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २४ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत ही अधिसूचना अंमलात असेल, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे : सिलिंडर भडक्यात जखमी महिलेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गरब्यासाठी सिनेकलाकार, विविध क्षेत्रातील मंडळी, राजकीय मंडळी येण्याची शक्यता विचारात घेऊन या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने हे सुसुत्रतेसाठी नियोजन केले आहे. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या रस्त्यावरुन वाहतूक करण्यास मुभा असेल, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.