कल्याण: कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावर एका गृह संकुलात आपल्या आई-वडिलांबरोबर राहणाऱ्या आठ वर्षाच्या बालिकेचा एका ४८ वर्षांच्या व्यक्तीने गेल्या महिन्यात विनयभंग केला होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तरुणाला मुंबईतील कांदिवली येथून अटक केली. रमेश मुरलीधर यादव असे अटक आरोपीचे नाव आहे. तो व्यवसाय निमित्त मुंबईतील कांदिवली येथे राहतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील जोनपुर जिल्ह्यातील गुणापूर गावचा रहिवासी आहे.

हेही वाचा : मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात आरोपी रमेश यादव हा पीडित मुलीच्या घरी पाहुणा म्हणून राहण्यास आला होता. रात्रीच्या वेळेत पीडित मुलगी स्वतः जवळील खेळणी रमेश यादव झोपलेल्या खोलीतील टेबलमध्ये ठेवण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला इशारा करून स्वतःजवळ बोलून घेतले. तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. घडल्या घटनेनंतर आरोपी कांदिवली येथे निघून गेला होता. पीडित मुलीच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. त्याला कांदिवली येथून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.