कल्याण : नियमित नोटिसा बजावुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप मालकाचा पेट्रोल पंप कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे अधिकारी आणि ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांनी मंगळवारी सील केला. रोशन पेट्रोल पंप मालकाकडे मालमत्ता कराची पालिकेची ९५ लाख १४ हजार रूपयांची थकबाकी आहे.

रोशन पेट्रोल पंप हा कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील महत्वाचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर सीलबंद करण्याची कारवाई केली तर त्याचा त्रास वाहन चालकांना होईल. या सहानुभूती विचारातून पालिकेने या थकबाकीदार पेट्रोल पंप चालकाला थकित कर भरणा करण्यासाठी मुभा दिली होती. अलीकडेच रोशन पेट्रोल पंप मालकाला थकित कर भरण्यासाठी ब प्रभागाच्या कर विभागातून नोटीस बजावण्यात आली होती. या रकमेचा टप्प्याने भरणा करावा, असेही प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केले. त्यालाही पंप मालकाने दाद दिली नाही.

हेही वाचा : कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ? कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी

अखेर मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, मालमत्ता कर विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी चिकणघर येथे जाऊन रोशन पेट्रोल पंप सील करण्याची कारवाई केली. जोपर्यंत मालमत्ता कराची थकित रक्कम पंंप मालकाकडून पालिकेत भरणा केली जात नाही तोपर्यंत सील न काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी सुरूच, बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीदारांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यांनी तातडीने आपली चालू, थकित रक्कम पालिकेत भरणा करावी आणि पालिकेकडून होत असलेली कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.