डोंबिवली : कल्याण -डोंबिवली परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थी पालकांची, कामावर निघालेले नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची अवकाळी पावसाने पळापळ केली. शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून पुढे पंधरा मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना आडोसा घेऊन चालावे लागत होते. सकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसाने पळापळ केली.

हेही वाचा : टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून पुढे पंधरा मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना आडोसा घेऊन चालावे लागत होते. सकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसाने पळापळ केली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी खरेदी विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची उघड्यावर ठेवलेली भाजी खराब होऊ नये म्हणून झाकून ठेवण्यासाठी तारांबळ उडाली. घरातून बाहेर पडताना अनेक नोकरदार मंडळींनी छत्री घेऊन बाहेर पडणे पसंत केले. मुले रेनकोट घालून शाळेत जात होती. शुक्रवारी सकाळीच आभाळ भरून आले होते. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती.