ठाणे : अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक जडघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ ते ३ डिसेंबर असे तीन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जीवनशैली बदलातून वजन कमी करणे आणि मधुमेह मुक्ती विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विशेष सत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या सत्रातून अंबरनाथकरांसमोर ” दीक्षित डाएट ” चे महत्व उलगडणार आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात हे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : चविष्ट जेवणासाठी मुलाचं राक्षसी कृत्य; विळ्याने वार करत जन्मदात्या आईचा घेतला जीव

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
Chief Minister Eknath Shinde started campaigning for assembly elections in Mumbai print politics news
मुंबई झोपडीमुक्त करणार- मुख्यमंत्री
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत

हेही वाचा : इन्स्टाग्रामवरचा स्वयंघोषित ‘डोंबिवलीचा किंग’ अटकेत; पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून काढली होती रील

अंबरनाथ येथे असणारे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालय शहरातील सर्वात जुने वाचनालय म्हणून ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित “अ तालुका” दर्जा प्राप्त हे ग्रंथालय शहरातील एकमेव ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात महत्त्वपूर्ण व दुर्मिळ संदर्भ ग्रंथासह सुमारे ४२ हजार ग्रंथसंख्या तसेच १०० च्या नियतकालिके आहेत. तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कांत अभ्यासिकेची सोय व मोफत इंटरनेट सेवाही ग्रंथालयाच्या मार्फत पुरविण्यात येते. मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील एकूण १२ वर्तमान पत्रे दररोज संस्थेत उपलब्ध असतात. ग्रंथालयाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ डिसेंबर रोजी ज्येष्ठ वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा भारतीयांचा प्राचीन ज्ञान खजिना या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर २ डिसेंबर रोजी जीवनशैली बदलातून वजन कमी करणे आणि मधुमेह मुक्ती विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि ३ डिसेंबर रोजी दिपाली केळकर या शब्दांच्या गावा जावे हा कार्यक्रम सादर करणार आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात सायंकाळी ५.३० वाजत हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांनी केले आहे.