ठाणे : राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शनिवारी रात्री बाॅम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बाॅम्ब शोधक पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. परंतु ही अफवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढतेय; आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यातील लक्ष्मीनगर भागात नाद बंगला आहे. त्यांच्या या निवासस्थानी बाॅम्ब असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, बाॅम्ब शोधक पथक, वर्तकनगर पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी घराची तपासणी केली. परंतु तिथे काहीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आलेली नाही. ही अफवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.