ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपुलावर एका मोटारीने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी टळली. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती. त्यामुळे नितीन कंपनी ते कोपरी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा : डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेत रामराज्याचा जयघोष, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटकोपर येथून वाघबीळच्या दिशेने एक व्यक्ती मोटारीने जात होती. ही मोटार नितीन कंपनी उड्डाणपुलावर आली असता, मोटारीतून धूर येऊ लागला. त्यामुळे चालक मोटारीतून बाहेर पडला. त्यानंतर मोटारीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथकाने येथील वाहतूक थांबविली. तसेच वाहतूक उड्डाणपुलाखालून वळविण्यात आली. या घटनेमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक पाऊण तास ठप्प होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर पथकाने मोटार रस्त्याच्या बाजूला केली. परंतु सायंकाळी उशीरापर्यंत महामार्गावर कोंडी कायम होती.