International Day of Yoga 2023 कल्याण-डोंबिवली शहराच्या विविध भागातील शाळा, पालिका कार्यालये, आस्थापना, राजकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन बुधवारी साजरा करण्यात आला. हजारो नागरिक, अधिकारी, विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी कल्याण मधील फडके मैदानावर आयोजित योग दिन कार्यक्रमात पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. भिवंडी, कल्याण, ग्रामीण भागातून नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहाटे आले होते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

योग ही आपली पाच हजार वर्षापुर्वीची परंपरा आहे. या परंपरेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आज जगभर योग दिन साजरा केला जातो, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मनुज जिंदल उपस्थित होते.

हेही वाचा >>>कळवा रुग्णालयात एकाच इंन्टेसिव्हिस्टवर अतिदक्षता विभागाचा भार; १२ पैकी ११ जागा रिक्त, पालिकेने भरती प्रक्रीया सुरू केली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे आयोजित योग दिनात अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते. ६०० हून अधिक शालेय विद्यार्थी पालिका कार्यक्रमात सहभागी झाले होते. सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली.शरीर, मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ एक दिवस योग दिनाचे पालन न करता योगाभ्यास हा दररोज दिनचर्येत अंगीकारावा, असे आवाहन आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले.