ठाणे : काश्मीरमध्ये मंगळवारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दहशतवाद्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातील नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीरचे निसर्ग सौंदर्य अनेकांना मोहीत करतो. त्यामुळे राज्यातील हजारो पर्यटक काश्मीरमध्ये सट्ट्यांनिमित्ताने जात असतात. ठाणे जिल्ह्यातूनही अनेक पर्यटक काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. परंतु मंगळवारी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. मागील सहा वर्षांतील हा सर्वात मोठा दहशदवादी हल्ला आहे. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले.

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये डोंबिवली येथील तिघांचा सामावेश आहे. डोंबिवली येथे राहणारे अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा या दहशदवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये अक्षरश: शोककळा पसरली आहे. तसेच पनवेल येथे राहणारे दिलीप देसले यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील पुढे आल्या आहेत.

या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अतिरेक्यांना जशास-तसे उत्तर देण्याची मागणी नागरिक करू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दोषिंना कडक शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही दिली आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाची हस्तक असलेली ‘द रेसिडन्स फ्रंट’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यानंतर आता केंद्रीय तपास पथकांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना, कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताच, त्यावर नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले आव्हाड…

‘सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याचा फायदा घेत भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सर्व सामान्य पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याचा तीव्र निषेध….. सोबतच ज्यांनी आमच्या देश बांधवांवर हल्ला केला त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा…जाहीर पाठिंबा….’ असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स्या समाजमाध्यमावर म्हटले आहे.