लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा गावा जवळील रुणवाल माय सिटी गृहप्रकल्पाच्या समुह विकास प्रकल्पातील पाच क्रमांकाच्या संकुलातील उद्वाहन चालकाचा तेराव्या माळ्यावरुन उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून गुरुवारी मृत्यू झाला.

याप्रकरणी गौरव चौधरी यांच्या तक्रारीवरुन बांधकाम व्यावसायिकाविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुषकुमार मनोज चौधरी (२०) असे मयत उद्वाहन चालकाचे नाव आहे. पियुषकुमार हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे गर्दी जमा झाली. मयताची ओळख पटविण्यात आली.

हेही वाचा… ठाणे: टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी ४२ बसगाड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी नवीन इमारतीच्या तेराव्या माळ्यावर उद्वाहनाच्या बाजुला विकासकाने संरक्षित अडथळा उभा केला नाही. तो लक्षात न आल्याने तो उद्वाहनाच्या खड्ड्यात पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. मयताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शाहू काळदाते याप्रकरणाचा तपास करत आहेत.