ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांना डाॅक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. डाॅक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या. या चाचण्या नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बाबत अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या नकारात्मक आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. तापामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सोडून देण्यात येण्याची शक्यता आहे.
प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री असून ते धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक हे निवडून येतात. शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांपैकी ते ओळखले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू आहेत.