लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : विरोधकांनी किती टीका केली तरी तुमच्या बळावर काम करतच राहणार असल्याचे सांगत आगामी विधानसभेची दहीहंडी महायुतीच फोडणार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केला.

ठाण्यात टेंभी नाका मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडीचे आयोजन करण्यात आले होते.  या उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावत गोविंदांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. विरोधकांनी कतीही आरोप केले, कितीही रडगाणे केले, तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

आणखी वाचा-कल्याणमध्ये माजी आमदाराच्या औषध विक्री दुकानात चोरी

आमच्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा अशा योजना आणल्या. परंतु या योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले असून यामुळे ते सातत्याने आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंधमुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.