लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शहरातील वेग‌वेगळ्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींना फूस लावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये दोन महिलांचा सामावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून एक अल्पवयीन मुलगी आणि आठ महिलांची सुटका केली आहे.

रईसा खान (४६), जोया शेख (२५) आणि युनीस शेख (४५) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. ठाणे शहरात महिलांना आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी गुरुवारी सायंकाळी उथळसर परिसरातील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी रईसा, जोया आणि युनीस या तिघांना रंगेहात पकडले.

आणखी वाचा-डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी सामानाचा वाहतुकीला अडथळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणात पोलिसांनी त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलगी आणि आठ महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी रईसा, जोया आणि युनीस या तिघांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.