ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबरला होणार आहे. या विमानतळाच्या नामकरणाविषयी वाद पेटला असताना विमानतळाच्या काही झलक आता समाजमाध्यमांवर मिळू लागले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छायाचित्र प्रसारित होत असून आता ओझरते चित्रीकरण देखील समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार आहे. मागील काही वर्षांपासून या विमानतळाचे काम सुरु होते. येत्या ३० सप्टेंबरला विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे नोटीफिकेशन २३ तारखे पर्यंत निघाले नाही. तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दि. बा. पाटील यांचे नाव लावले नाही ना.. तर उद्घाटन करुन दाखवा. आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी १५ व्हायला पण तयार आहोत. सरकारचे १२ वाजवून टाकू. आम्ही कायद्याने मागत आहोत. आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही म्हात्रे म्हणाले होते. तसेच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल असा इशाराही त्यांनी दिला होता.
या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले आहे का, याबाबत शासंकता असली तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काही छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागले आहेत. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय असल्याने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. प्रशस्त मोठे असे हे विमानतळ असून फ्लोरिंग चकाकत आहे. विमानतळाच्या मध्यभागी स्थित एक ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे. टर्मिनलची रचना भारताच्या राष्ट्रीय फुलाच्या, कमळाच्या प्रभावाखाली आहे.
विमानतळाच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?
हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र इतका मोठा आहे. पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन होते. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असून चार प्रवासी टर्मिनल, कार्गो पायाभूत सुविधा, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स (सीटीसी), एटीसी टॉवर, जनरल एव्हिएशन टर्मिनल, देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती (एमआरओ) सेवा येथे उपलब्ध आहे. विमानतळाव दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन (MMT) माल वाहतूक करेल.
ठाणे ते कल्याण आणि नवी मुंबईकरांना मोठा फायदा
या आंतराष्ट्रीय विमानतळामुळे मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून येथील स्थानिकांना विशेषत: भूमिपुत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे. विमानतळ भागातील हाॅटेल मालकांनाही लाभ होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय भागात प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.