ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी उड्डाणपूलाच्या सुरूवातीला असलेल्या कठड्याला धडकली. सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. तर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. हे ही वाचा. वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा हे ही वाचा. Maharashtra News Live : “समृद्धी महामार्गावर चक्काजाम करणार”, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. अपघात, रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतुक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतुक करत होती. बसगाडी मानपाडा उड्डाणपूलाजवळ आली असता, उड्डाणपूलाच्या कठड्याला बसगाडी धडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच पातलीपाडा येथे असेच दोन अपघात अवजड वाहनांचे झाले होते. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.