ठाणे : ठाणे जिल्ह्यातून काश्मीरमध्ये ४० जण पर्यटनासाठी गेले होते. त्यापैकी डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला असून इतर ३७ पर्यटक अडकले आहेत. हे पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

काश्मिरमधील पहेलगाममध्ये मंगळवारी दहशदवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातून काश्मीरमध्ये ४० पर्यटक गेले होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ पर्यटक सुरक्षित आहेत. पर्यटकांमध्ये काही लहान मुले देखील आहेत.

पर्यटकांची नावे पुढील प्रमाणे

अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).

जिल्हा प्रशासनाचे लक्ष

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन – या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे. पहेलगाम येथे जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक, व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात. दूरध्वनी क्रमांक: ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सॲप क्रमांक: ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.