ठाणे : पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध भागात झाल्या आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील तीन आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाची बदली इतरत्र झाली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बढत्या आणि बदल्यांबाबत चर्चा सुरू होती. मंगळवारी राज्याचे अपर पोलीस महासंचालक डाॅ. सुखविंदर सिंह यांनी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. तर ठाणे ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचा सामावेश आहे.
ठाणे शहर पोलीस दलातील नरेश पवार आणि रविंद्र वाणी यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली आहे. तर रामचंद्र मोहीते यांची रायगड पोलीस दलात बदली झाली. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सुरेश कदम यांची बदली पुणे शहर येथे झाली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शामराव चव्हाण यांची बदली मुंबई पोलीस दलात आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संजय काशिद यांची पालघर पोलीस दलात बदली झाली आहे.