गेल्याकाही दिवसांपासून कर्जत आणि कसारा मार्गावरील उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक विविध कारणांमुळे विलंबाने होत आहे. या रेल्वेगाड्या दररोज सकाळी आणि रात्रीच्या गर्दीच्या वेळेत २० ते २५ मिनीटे उशीराने धावत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भाच्या तक्रारी प्रवाशांकडून आल्यानंतर उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : महिला बचत गटांना मिळतेय आर्थिक उभारी ; दीड कोटी रुपयांचे कर्ज वाटप

Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

गेल्या काही वर्षांपासून बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कर्जत आणि कसारा भागात मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. त्यामुळे या भागातून दररोज हजारो नोकरदार सकाळी कामानिमित्ताने ठाणे, मुंबई, नवी मुंबईत येत असतात. परंतु मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे कर्जत आणि कसारा भागात जाणाऱ्या धिम्या आणि जलद रेल्वेगाड्या या २० ते २५ मिनीटे उशीराने धावत आहेत. त्याचा परिणाम नोकरदारांवर होऊ लागला आहे. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी उशीराने पोहोचावे लागत असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मानसिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तर, रात्रीच्या वेळेतही रेल्वेगाड्यांची वाहतूक उशीराने असल्याने या प्रवाशांना घरी पोहचण्यासही विलंब होत आहे. अनेकदा उशीराने रेल्वेगाड्या धावत असल्याने फलटांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेगाडीत प्रवेश करणेही कठीण होत असते. महिला प्रवाशांचे यामध्ये सर्वाधिक हाल होत आहेत. यासंदर्भाच्या तक्रारी उपनगरीय रेल्वे प्रवाीस एकता महासंघाकडे येऊ लागल्या आहे. त्यामुळे महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील चार महिन्यांपासून या मार्गावर अशापद्धतीने रेल्वेगाड्यांची रखडपट्टी होत असल्याचे महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण

गेल्या चार महिन्यांपासून कर्जत-कसारा मार्गावर उपनगरीय रेल्वेगाड्या अनियमित धावत आहेत. यापूर्वी टिटवाळा-आसनगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी आंदोलन केले होते. प्रवाशांच्या भावना अधिक संतप्त होण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा आझाद मैदानात आंदोलन करण्यात येईल. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकदा महासंघ.

मागील अनेक दिवसांपासून उपनगरीय रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दररोज विलंबाने गाड्या येत असल्याने प्रवाशांची गर्दीही रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाडीत होत असते. गाड्यांमध्ये गर्दी झाल्यास गाडीत प्रवेश करणेही कठीण होते. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेगाडी सोडून द्यावी लागते. त्यामुळे घरी पोहचण्यास आणखी उशीर होतो. – रितेश पवार, प्रवासी.