ठाणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांच्या कार्याचा तसेच योगदानाचा सार्वजनिकरित्या गौरव व्हावा आणि वृद्धापकाळात त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य शासनानाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ साठी अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, ठाणे जिल्ह्यात देखील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आवाहन केले जात असून ३१ जुलै पर्यंत पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करायचा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

राज्यात कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांसाठी शासनाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ साठी अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीला दर महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले सरकार या संकेतस्थळावर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ठाणे जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

योजनेसाठी पात्रता निकष

• अर्जदाराचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे

• दिव्यांग व्यक्तींसाठी वयोमर्यादा ४० वर्षे

• कला/साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षे सातत्यपूर्ण व दर्जेदार योगदान असणे आवश्यक

• अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- रुपयांपेक्षा कमी असावे

• फक्त कलेवर अवलंबून असणारे किंवा सध्या उत्पन्नाचा अन्य स्रोत नसलेले कलाकार

• केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले

• अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक

•विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, वयाने ज्येष्ठ कलाकारांना प्राधान्य

या योजनेसाठीआवश्यक कागदपत्रे

• वयाचा दाखला

•आधार कार्ड

• रहिवासी दाखला

• उत्पन्नाचा दाखला

•प्रतिज्ञापत्र

•पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)

• बँक पासबुक झेरॉक्स

• अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास)

•पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)

• शिफारसपत्र (नामवंत संस्था/व्यक्तीचे – लागू असल्यास)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

•कलात्मक कार्याची विविध साक्षी/पुरावे