डोंबिवली – मुंबई, ठाण्यासह डोंबिवली परिसरातील गुंतवणूकदारांना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा अशोकनगरमध्ये राहत असलेल्या एका भामट्याने सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह इतर गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फसवणूक केल्यानंतर हा भामटा आपले जयहिंद कॉलनीमधील गोपी मॉलमधील कार्यालय बंद करून पळाला आहे. त्याच्या घराला कुलूप असल्याने गुंतवणूकदार हवालदिल आहेत. सुदाम महादू गिते असे फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील अशोकनगर मधील सोनुकाटे इमारतीत राहतो. गिते एन्टरप्रायझेस नावाने त्याने जयहिंद कॉलनीतील गोपी सिनेमा माॅलमध्ये कार्यालय सुरू केले होते.

cop shoots wife dead in nanded district over minor dispute
पत्नीचा गोळी झाडून खून केल्यानंतर पोलीस कर्मचारी ठाण्यात हजर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Navi Mumbai Municipal Corporation will have to help in 14 villages in case of emergency
नवी मुंबई : आपत्कालीन स्थितीत १४ गावांत महापालिकेचीच धाव!
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
unauthorized hawkers, Andheri,
अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही
cyber crime
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक
education department, Mumbai municipal corporation,
मुंबई : शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची पळापळ
Market Licensing Department, illegal meat sellers,
कल्याणमध्ये अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाची कारवाई

रुपकुमार मारोतराव बेलसरे (६०) असे फसवणूक झालेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मुंबईत कुर्ला भागात कुटुंबीयांसह राहतात. ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली गोळवलीतील शुभारंभ बॅन्क्वेट हॉल बेकायदा इमारत जमीनदोस्त करा, मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश

आरटीओ अधिकारी रुपकुमार बेलसरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपण स्वत २०२२ मध्ये परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालो. २०११ मध्ये आपले एक सहकारी सुरेंद्र अन्नमवार निवृत्त झाले. ते ठाणे येथे राहतात. अन्नमवार यांनी गिते यांना सांगितले की डोंबिवलीत सुदाम महादू गिते हे गुंतवणूक सल्लागार आहेत. ते आपल्या गुंतवणुकीवर चार टक्के परतावा देतात. आपण स्वता ४९ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यावर आकर्षक परतावा मिळतो.

ही गुंतवणूक योजना चांगली वाटल्याने बेलसरे यांनीही आपल्या निवृत्तीनंतर मिळालेली एकूण ४० लाखाची रक्कम गिंते यांच्या आयसीआयसीआय बँकेत धनाव्दारे सप्टेंबर २०२२ मध्ये जमा केली. ठरल्याप्रमाणे या रकमेवर गिते यांनी ४० हजार रूपयांचा परतावा बेलसरे यांच्या बँक खात्यात जमा केला. बेलसरे यांनी आणखी दहा लाख रूपये पत्नी वर्ष आणि स्वताच्या नावे गिते यांच्याकडे गुंतविले.

या रकमेवरील परताव्याची वेळ आली तेव्हा गिते यांनी आता शेअर मार्केट खाली गेले आहे. त्यामुळे परतावा देण्यात अडचणी आहेत. शेअर मार्केट वर गेले की तुमचा शिल्लक १० लाखाचा परतावा तुम्हाला योग्यवेळी देऊ असे सांगितले.

हेही वाचा >>> वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रामुळे उद्योजक हैराण; लघु उद्योजक संघटनेचे महापालिकेला हस्तांतरण केंद्र हटविण्याचे आवाहन

पहिल्या परताव्यानंतर बेलसरे यांना दुसरा परतावा मिळाला नाही. याबाबत बेलसरे यांनी भामटा गिते याला विचारणा केल्यावर आयसीआयसीआय बँक आपणास चांगली सेवा देत नाही म्हणून आपल्या १५० गुंतवणूकदारांची बँक खाती आपण ॲक्सिस बँकेत वळती करत आहोत. त्यामुळे परतावा देण्यास विलंब होत आहे. अनेक महिने अशी टाळाटाळ सुरू होती. बेलसरे, अन्नमवार यांनी आयसीआयसीआय बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना गिते यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये काढले असल्याचे समजले. एप्रिल २०२४ पासून गिते यांनी गुंतवणूकदारांना परतावा न देता गोपी माॅलमधील कार्यालय बंद आणि घराला कुलुप लावून पळ काढला आहे. दररोज अनेक गुंतवणूकदार गोपी माॅलमधील कार्यालयाकडे फेऱ्या मारत आहेत. आपली व अन्नमावर यांची ६१ लाखाची आर्थिक फसवणूक केल्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.