scorecardresearch

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात रिक्षाचालक रॅली काढणार

महापालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेल्या रिक्षा

Thane auto Rally

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात रिक्षाचालक रॅली काढणार आहेत. यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेल्या रिक्षा उभ्या केल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाणे महानगरपालिका परिसरात रिक्षा चालक जमा झाले आहेत. ‘मी रिक्षावाला – मी मुख्यमंत्री’ अशी वाक्य असलेले टी शर्ट रिक्षा चालकांनी घातले आहेत. “रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती” अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तेव्हा या टीकेला एकप्रकारे प्रत्युत्तर देण्याचा शिंदे समर्थकांचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rickshaw drivers will hold a rally in thane in support of chief minister eknath shinde msr

ताज्या बातम्या